तामसवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 19:50 IST2019-06-09T19:48:58+5:302019-06-09T19:50:23+5:30
सायखेडा : तामसवाडी (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी नितीन श्रीहरी सांगळे (३७) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली,

तामसवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
सायखेडा : तामसवाडी (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी नितीन श्रीहरी सांगळे (३७) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली,
सकाळी घरातील माणसांनी शोध घेतला असता कुठेही आढळून आले नाही. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरच्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह विहिरीत तरंगलेला दिसला. पोलीस पाटील यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दूरध्वनी वरून कळविले, त्यानंतर विहिरीतुन मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आला. सांगळे यांच्यावर सहकारी संस्था, दुकानदारांची उधारी, पतसंस्था, सोनेतारण असे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले निफाड येथील शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येविषयीचा अहवाल नांदूरमध्यमेश्वरच्या मंडल अधिकाऱ्यांनी तात्काळ निफाडच्या तहसीलदारांना दिला आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन, सायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक रामचंद्र कर्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार त्रिभुवन करत आहेत.