तळेगावरोही येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By Admin | Updated: March 3, 2016 23:37 IST2016-03-03T23:31:00+5:302016-03-03T23:37:32+5:30
तळेगावरोही येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या

तळेगावरोही येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
चांदवड : तालुक्यातील तळेगावरोही येथील तरुण शेतकरी नामदेव सुकदेव गिते (३६) यांनी कर्जाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली.
नामदेव गिते यांंनी एकत्रित कुटुंबातील वडिलांच्या नावे असलेल्या गट क्रमांक ३३४ क्षेत्र एक हेक्टर ६३ आर जमिनीवर २०१३ साली विविध कार्यकारी सोसायटीचे साठ हजार रुपये कर्ज काढले होते. सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यांच्यावर एकूण एक लाख ६३ हजार १६५ रुपये इतके कर्ज होते. यामुळे त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगितले जाते.
नामदेव गिते यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. दरम्यान, चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाघ, चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)