अभोण्यात शेतकऱ्याची आत्महत्त्या
By Admin | Updated: March 27, 2017 01:02 IST2017-03-27T01:02:30+5:302017-03-27T01:02:52+5:30
अभोणा : येथील शेतकरी नारायण दामू बागुल (५५), रा. ढेकाळे यांचा मृतदेह येथील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. नारायण बागुल दि.१९ पासून बेपत्ता असल्याची तक्र ार बागुल कुटुंबीयांनी दिली होती.

अभोण्यात शेतकऱ्याची आत्महत्त्या
अभोणा : येथील शेतकरी नारायण दामू बागुल (५५), रा. ढेकाळे यांचा मृतदेह येथील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. नारायण बागुल दि.१९ पासून बेपत्ता असल्याची तक्र ार बागुल कुटुंबीयांनी दिली होती. बागुल यांनी कंबरेला दोराच्या सहायाने दगड बांधून वापरात नसलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली. नारायण दामू बागुल यांच्या घरात त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली आहे. कांद्यास व इतर पिकास भाव नसल्याने व डोक्यावर कर्ज असल्याने जीवन संपवत असल्याचे त्यात लिहिले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एम. मालचे, हवालदार रघुनाथ भरसट, तानाजी झुरडे व निलेश शेवाळे, मुरलीधर साबळे, हेमंत भुजबळ करीत आहे. गेल्या आठवड्यात दळवट (ता. कळवण) येथील शिवारात तांबडीनदी पात्रानजीक एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. त्या मृत्यूबाबतही लोकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे आठ दिवसांत २ मृत्यू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.