शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:39 IST2018-11-02T00:37:28+5:302018-11-02T00:39:31+5:30
दिंडोरी : कर्जाची परतफेड करता येत नसल्याने हतबल झालेल्या तालुक्यातील वागळूद येथील साहेबराव तुकाराम कड (५७) या शेतकºयाने आत्महत्या केली आहे.

साहेबराव कड
ठळक मुद्देकड यांच्यावर बँकेचे १९ लाख रु पये कर्ज आहे.
दिंडोरी : कर्जाची परतफेड करता येत नसल्याने हतबल झालेल्या तालुक्यातील वागळूद येथील साहेबराव तुकाराम कड (५७) या शेतकºयाने आत्महत्या केली आहे.
बुधवारी सायंकाळी सात वाजता साहेबराव कड यांनी स्वत:च्या शेतात विषारी औषध घेतले. वडील शेतातून घरी का येत नाही हे बघण्यासाठी मुलगा अविनाश शेतात गेला असता वडिलांनी विषारी औषध घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांना दिंडोरी येथील खासगी रु ग्णालयात दाखल केले असता गुरु वारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कड यांच्यावर बँकेचे १९ लाख रु पये कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.