शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

येवला बाजार समितीतील अनागोंदीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:16 IST

नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्दे २४ तासात पैसे अदा होतील याची व्यवस्था करावी अशी मागणी

नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.व्यापारी अर्जावरून‌ मार्केट दिवसेंदिवस बंद ठेवणे, मार्केट बंदचा फलक मार्केट बंदच्या दिवशी लावणे त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण मन:स्ताप सहन करीत परत जावे लागत आहे. विकलेल्या मालाचे पैसे २४ तासांत व्यापारी अदा करणार असा गवगवा मार्केट कमिटीने केला; पण प्रत्यक्षात काही व्यापाऱ्यांकडून ८/१५ दिवसांच्या अंतराने पैसे दिले जातात.

या प्रकाराची दखल घेतली जात नसल्यामुळे माल विकूनदेखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. शेतकरी शेतमाल बाजारात आणण्यासाठी रात्री-अपरात्री ट्रॅक्टर भरून आणतात. तो माल मार्केटमध्ये विकतात, मात्र व्यापारी त्यांना त्यांच्या सोयीने पैसे देतात अशावेळी शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न नगरसूल येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर निकम यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

संबंधित प्रशाकीय अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना २४ तासात पैसे अदा होतील याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड