शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद
By Admin | Updated: July 30, 2016 01:16 IST2016-07-30T01:13:58+5:302016-07-30T01:16:23+5:30
गोणी पद्धतीला विरोध : सायखेडा मार्केट पाच दिवसांपासून बंद

शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद
लासलगांव : कांदा उत्पादकांना गोणी पद्धतीने कांदा लिलाव अमान्य असल्याने त्याला विरोध दर्शवण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारात आज संतप्त शेतकऱ्यांनी दिवसभरात दोनवेळा कांदा लिलाव बंद पाडले. बाजार समितीचे सभापती व स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत झाले.
उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना कांदा गोणी लिलावासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. गोणी पध्दतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आज येथील आवारात कांद्याला कमी भाव पुकरण्यात आल्याने कांदा गोणी लिलाव बंद करण्याची जोरदार मागणी करत शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लिलाव बंद पाडला. सभापती जयदत्त होळकर, सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, उपसचिव सुदीन टर्ले, राजेंद्र पाटील, दत्तात्रय होळकर, सुनील डचके यांनी कांदा बाजार आवारात भेट देऊन संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले . दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा गोणी पध्दतीला विरोध करता इतर जिल्ह्यात ज्या पध्दतीने गोणी लिलाव होतो तसाच लिलाव करावा यामागणीसाठी लिलाव बंद पाडला. याची माहिती मिळताच सहय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे उपसचिव टर्ले व डचके या अधिका-यांनी बाजार आवारावर धाव घेतली ज्या शेतक-यांना माल विक्र ी करायचा आहे त्यांना माल विक्र ी करु ण द्यावा शेतक-यांची खोटी करु नये अशी समजूत घालत पुन्हा लिलाव सुरु केले. दिवसभरात १४०५२ गोणीतून६३२३.४० क्विंटल कांदा विक्र ी झाला जास्तीजस्त ९१८ रूपये, सरसरी८५० रुपये तर कमीतकमी ३५० रूपये प्रतिक्विंटल भाव
मिळाला. (वार्ताहर)