कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:15 IST2020-01-18T22:00:00+5:302020-01-19T01:15:39+5:30
सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम!
पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढउतार होत असल्याने शेतकºयांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरू असून, कांदा काढणीला वेग आलेला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी दिवसरात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे. मात्र तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकºयांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे. कांद्याला सध्या सोन्याचा दर असल्याने शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. चोरटे कांद्यासह शेतकºयांच्या शेतोपयोगी साहित्यांचीही चोरी करत आहे. यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. यात विद्युतपंप, स्टार्टर, केबल, पाईप, औषध फवारणी पंप आदी वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरीवर्ग तक्र ार करीत नाही, तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेतपिकांना हानी होऊ नये, म्हणून तक्रार करत नाही़
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपासून तालुक्यात कांदा चोर सक्रिय झाले आहेत. कांद्यासह शेतोपयोगी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कांदा चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.