पंचवटी : जो शेतकरी कष्टाने अन्न-धान्य पिकवितो आणि सर्व जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करतो तो परमेश्वराहून वेगळा नाही. त्यामुळे जन्मदाते माता-पिता, शेतकरी व सैनिक देवाची रूपे आहेत. या तिन्ही घटकांचा आदर करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असे मत भागवताचार्य दशरथ महाराज उकिर्डे यांनी केले.पंचवटीतील अमृतधाम परिसरातील साईनगरमधील साई मंदिरात साईदत्त संस्थानतर्फे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह आणि श्रीमद्भागवत कथेला प्रारंभ झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उकिर्डे महाराज पुढे म्हणाले, भीष्माचार्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून केवळ देशसेवा केली. भीष्माचार्यांसाठी श्रीकृष्णाला आपली प्रतिज्ञा मोडावी लागली व शस्त्र हातात घ्यावे लागले, असे महाराज म्हणाले.कार्यक्रमाला ज्ञानेश्वर सोमासे, शरद शिंदे, सागर परदेशी, राहुल पेंभारे, किशोर बडगुजर, दिलीप वाघ, महेश झाल्टे, मनोहर शिवले, दामोधर बच्छाव, सुभाष सांगळे, विनोद शिरसाठ, योगेश फड, विनायक सांगळे, संजय नेरे आदींसह भाविक उपस्थित होते.विदूर पती-पत्नीने झोपडीत देवाला जेवण दिले. भगवान श्रीकृष्णाला दुष्ट दुर्याधनाच्या छपन्न भोगापेक्षा विदुराची भक्ती श्रेष्ठ ठरली. म्हणून अन्न सेवन करताना कोठे खावे याचा विचार करावा, ज्या माता-पित्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांचा वृद्धापकाळात सांभाळ करणे आपले कर्तव्य आहे, असे महाराजांनी सांगितले.
शेतकरी, सैनिकांचा करा सन्मान :दशरथ महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:12 IST
जो शेतकरी कष्टाने अन्न-धान्य पिकवितो आणि सर्व जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करतो तो परमेश्वराहून वेगळा नाही. त्यामुळे जन्मदाते माता-पिता, शेतकरी व सैनिक देवाची रूपे आहेत. या तिन्ही घटकांचा आदर करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असे मत भागवताचार्य दशरथ महाराज उकिर्डे यांनी केले.
शेतकरी, सैनिकांचा करा सन्मान :दशरथ महाराज
ठळक मुद्दे भागवतकथेला प्रारंभ