शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : इ. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तीस दिवस प्रशिक्षणकृषी कार्यकर्त्यांसाठी ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ शिबीर

नाशिक : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी अभियंता राजाराम पाटील, डॉ. प्रकाश कदम आणि कृषी विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन , संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभाग प्रयत्नशील असतात. परंतु कृषी विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे गुणोत्तर खूपच जास्त असल्याचे चित्र आढळते. त्यामुळे गावपातळीवर कृषी शास्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल अशी आशाही कुलगुरू वायुनंदन यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विस्तार सेवांची गरज, लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखणे, कार्यक्रमांची आखणी करणे, आद्यरेषा प्रात्याक्षिके, शेती व्यवसायाला पूरक घटक व त्यांचे व्यवस्थापन, शेतमाल विपणनातील अडचणी व उपाय, नैसर्गिक साधनस्रोत व्यवस्थापन यासंबंधी संपूर्ण कौशल्य या प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठeducationशैक्षणिकFarmerशेतकरी