शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

समृद्धी महामार्गाला जागा  देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:00 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. शासनाने यापूर्वीच सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी केली असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. समृद्धीसाठी ८५ टक्के जमिनीचा ताबा शासनाला मिळाला आहे.  समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील सुमारे ४९ गावांमध्ये जमिनीची खरेदी करण्यात  येत असून, त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊ केला आहे.  परंतु सुरुवातीला शेतकºयांनी या महामार्गाला व जमीन देण्यास विरोध केल्याने काहीशा उशिराने जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली होती. परंतु अशा परिस्थितीत जमिनीचा मोबदला चारपटच मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान करून घेण्यापेक्षा संमतीने जागा देण्याची तयारी दर्शविली असून, शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याने तत्पूर्वीच शेतकºयांनी आपापसातील हेवेदावे तसेच न्यायालयीन दावे मागे घेत शासनाला जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. इगतपुरी तालुक्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास ८५ टक्के संपादन झाले असून, जागा देण्यासाठी दररोज शेतकºयांची रीघ लागत असल्याने आणखी दोन टक्क्याने संपादन वाढण्यास मदत होणार आहे. आजपावेतो जिल्ह्णातील सहा हजार जागामालक शेतकºयांकडून समृद्धीसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे.  गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावर शेतकºयांची समजूत काढून त्यांना जमीन देण्याचे काम सुरू आहे. साधारणत: ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर उर्वरित जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जे शेतकरी संमतीने जागा देणार नाहीत, त्यांची जागा सक्तीने घेतली जाईल व त्यासाठी निवाडे जाहीर केले जाणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय