यावेळी करण गायकर यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील शेतकरी व कामगार यांच्यावरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या भाताला हमीभाव मिळावा, सरकारी काटा सुरळीत चालावा यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. तालुक्यात असलेली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असतानादेखील भूमिपुत्र कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संघटनेने वेळोवेळी लढा दिलेला आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. याबाबतीत संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन या समस्यांवर कायमस्वरूपी प्रभावी तोडगा काढावा, अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा यावेळी गायकर यांनी दिला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील भोर व शेतकरी नेते नारायण जाधव यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, कामगार आघाडी संपर्कप्रमुख मनोहर मुसळे, तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, कामगार आघाडी उपजिल्हाप्रमुख रवि धोंगडे, युवा आघाडी शहराध्यक्ष गणेश दळवी, कुंदन हिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी छावा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:41 IST
नांदूरवैद्य : भातशेतीचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हमीभाव, तसेच इतर प्रलंबित न्यायिक मागण्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत घोटी येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात बैठक पार पडली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी छावा आक्रमक
ठळक मुद्देघोटीत बैठक : तहसीलला टाळे ठोकण्याचा इशारा