Farmer's preference for sugarcane bagasse | उसाच्या बांडीला शेतकऱ्यांची पसंती
औंदाणे भागात ऊसतोड कामगाराकडून ऊसबांडी खरेदी करताना शेतकरी.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पादनासाठी शेतकरी व व्यावसायिक म्हशीसाठी हिरवा चारा म्हणून उसाच्या बांडीला पसंती देत आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी अन्य ठिकाणी अवकाळी पाऊस, अळी व रोगांमुळे चारा खराब झाला आहे. चाराटंचाई भासू नये म्हणून दुग्ध उत्पादक शेतकरी सायंकाळच्या सुमारास ऊस कामगारांकडून १२० रुपये शेकडा दराने ऊसबांडी खरेदी करत आहेत. सायंकाळच्या सुमारास खेडे गांवामध्ये गर्दी होत आहे. शेतकरी बैलगाडी, रिक्षा, मोटरसायकलने बांडी खरेदी करून घेऊन जात आहेत. उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये म्हणून शेतकरी आतापासून उसाची बांडी खरेदी करून साठवण करत आहे. शेतीला जोड म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय चाºयाअभावी अडचणीत येऊ पाहत आहे त्यामुळे शेतकरी रोज ऊसबांडी खरेदी करत आहे.

Web Title: Farmer's preference for sugarcane bagasse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.