भात शेतीसाठी शेतकऱ्यांची शेणखताला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:28+5:302021-06-01T04:11:28+5:30

देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर भात, नागली आणि वरईचे उत्पादन काढले जाते. मात्र, खते दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा पारंपरिक खतांच्या वापराकडे ...

Farmers prefer cow dung for paddy cultivation | भात शेतीसाठी शेतकऱ्यांची शेणखताला पसंती

भात शेतीसाठी शेतकऱ्यांची शेणखताला पसंती

देवगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर भात, नागली आणि वरईचे उत्पादन काढले जाते. मात्र, खते दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा पारंपरिक खतांच्या वापराकडे जोर वाढत आहे. रासायनिक शेती मानवी आरोग्याला व निसर्गसंपदेला धोकादायक ठरत आहे. तसेच या खतांचे दरही प्रचंड वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत यासारख्या पारंपरिक, नैसर्गिक खतांना शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे भात शेतीसाठी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर होत असून, आरोग्यदायी धान्यासह जमिनीची सुपीकताही टिकवण्यास मदत होणार आहे.

इन्फो

शेणखताचाही भाव वधारला

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात शेतीसाठी पोषक असणारी सुपीक कसदार जमीन आहे. मात्र, वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा भडिमारामुळे या जमिनीची प्रतवारी खालावली आहे. तसेच उत्पादित शेतमालाला कमी दर मिळत असल्याने महागडी रासायनिक खते खिशाला परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात नैसर्गिक खतांचा वापर करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे शेणखताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेणखताचा भावही वधारला आहे.

कोट....

महागड्या रासायनिक खतांचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ही खते परवडत नाहीत. त्यापेक्षा नैसर्गिक शेणखत वापरामुळे जमिनीची सुपीकताही वाढते आणि उत्पादनही वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांचा भात शेतीसाठी शेणखताचा वापर करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे.

- हेमा वारे, शेतकरी

फोटो- ३१ देवगाव शेणखत

===Photopath===

310521\31nsk_16_31052021_13.jpg

===Caption===

फोटो- ३१ देवगाव शेणखत 

Web Title: Farmers prefer cow dung for paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.