शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

By Admin | Updated: March 5, 2017 00:56 IST2017-03-05T00:56:08+5:302017-03-05T00:56:24+5:30

येवला : येथील अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली.

Farmers' pockets are empty | शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

शेतकऱ्यांची झोळी रिकामीच

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्यात तब्बल १५ लाख १५ हजार ३४९ क्विंटल कांद्याची आवक झाली. या दोन महिन्यात कांद्याला सरासरी केवळ ४६० ते ५६० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला असला तरी सुमारे ७८ कोटी रु पयांचा व्यवहार झाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोल भावाने शहरवासीयांना मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली असल्याचा सूर सर्वत्र व्यक्त होत आहे.
गेल्या २ ते ३ वर्षापासून दुष्काळाला सामोरे जात असलेला येवला तालुका गेल्या वर्षातील पर्जन्यमानाने सरासरी हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला होता. पिकांनाही पोषक वातावरण मिळाले, रोगराई पासून पिके वाचली. बाजरी, सोयाबीन,मका परवडत नसल्याने ,खरीप आणि रब्बीत नगदीपिक
म्हणून शेतकरी कांद्याकडे वळाले. एकरी खर्च ५० ते ५५ हजार झाला. यंदा कांद्याचे विक्र मी उत्पन्न झाले. कांद्याला किमान १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची अशा असतांना कांद्याचा उत्पादन खर्चदेखील फिटला नाही.
येवला बाजार समितीची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यानंतर तब्बल ६० वर्षांनी कागदोपत्री विक्र मी उत्पादनाने सुमारे ७८ कोटींचा व्यवहार दिसत असला तरी, शेतकऱ्याच्या पदरात निराशेशिवाय काहीच पडले नाही. शेतकऱ्याचा कांदा मार्केटला येण्याची वेळ असताना नोटबंदीचा निर्णय झाला. अनंत अडचणींना सामोरे जात असतांना शेतकऱ्याने संयम दाखवला.
सध्या येवला व अंदरसूल उपबाजार आवार कांद्याने फुलून गेला आहे. कांद्याचे लिलाव रात्री ७ वाजेपर्यंत चालत आहेत.(वार्ताहर)
बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार, कैलास व्यापारे, बंडू आहेर, संजय ठोक, रवींद्र बोडके, अनिल कांगणे, सिद्धेश्वर जाधव, यांच्यासह कर्मचारी मेहनत घेत आहेत.

Web Title: Farmers' pockets are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.