शेतकऱ्यांचा महामुक्काम मोर्चा
By Admin | Updated: March 27, 2016 00:02 IST2016-03-26T23:02:19+5:302016-03-27T00:02:13+5:30
शेतकऱ्यांचा महामुक्काम मोर्चा

शेतकऱ्यांचा महामुक्काम मोर्चा
नाशिक : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतमालाचे रास्त भाव, दुष्काळी पीक नुकसानभरपाई व जमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नाशिकला २९ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा महामुक्काम मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
२९ मार्च रोजी दुपारी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर
राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांची जाहीर विराट सभा होऊन तेथून या महामुक्काम मोर्चाला सुरुवात
होईल.
या जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून माकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार हन्नन मोल्ला, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेनंतर हा महामुक्काम मोर्चा आदिवासी विकास भवनावर जाणार आहे.
जोपर्यंत शासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. ४० लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे. यासह प्रमुख मागण्यांसाठी हा महामुक्काम मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)