शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाटणे परिसरातील शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 18:04 IST

पाटणे: परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी विक्रमी स्वरूपात होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतक-यांनी पुन्हा बियाणे ३ ते ४ हजार रुपये किलो दराने खरेदी करून रोपे तयार केली. त्यामुळे एकाच वेळी सध्या कांद्याची लागवड सुरू आहे. यावर्षी मुबलक पावसामुळे सर्वत्र विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच मध्यंतरी कांद्याचे भाव वाढल्यामुळे कांदा पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी मजुरी एकरी ७ ते ८ हजार रुपये किंवा अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर वर्ग कांद्याची लागवड करताना दिसून येत आहेत. लागवडीचा वाढता खर्च, रोपांचा भाव, मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढीव दर, भारनियमन अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन बळीराजा कांदा लागवड करताना दिसत आहे.खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कांदा लागवडीपूर्वीची मशागत ५ हजार रुपये, कांदा लागवड मजुरी ८ हजार रुपये, कांदा बियाणे व रोप लागवड करण्यायोग्य होईपर्यंत १० हजार रुपये खर्च, ३ हजार रुपये रासायनिक खते, ५ हजार रुपये शेणखत तसेच मजुरांची वाहतूक खर्च वेगळाच असतो. इतका खर्च करावा लागत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय कांद्याचे उत्पादन चांगले मिळेलच याची शाश्वती नाही. उन्हाळ कांद्याची विक्रमी लागवड सुरू असतानाच शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरांची टंचाई, वाढती मजुरी, रोपांचा तुटवडा, भारनियमनाचा फटका, वाढती थंडी या सर्व समस्यांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा