शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापाच्या भरात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकला नाल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:31 IST

टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी संतापाच्या भरात नाल्यामध्ये फेकून दिला.

मातोरी : टोमॅटोची अचानक आवक वाढल्याने परिसरातील उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, शनिवारी गिरणारे बाजारपेठेत शेतक-यांनी अक्षरश: व्यापा-यांची विनवणी करून खरेदी करण्याचा आग्रह धरला, परंतु मिळत असलेल्या अल्प भावामुळे काही शेतक-यांनी आपला माल घरी नेला तर काहींनी संतापाच्या भरात नाल्यामध्ये फेकून दिला.  गिरणारे येथील बाजारपेठ मातोरी व परिसरातील शेतकºयांना जवळची असल्याने शेतकरी आपल्या टोमॅटोेच्या जाळ्या बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव पडले असून, शेतकरी आज ना उद्या बाजारभाव स्थिर होतील, या आशेवर होते. परंतु शनिवारी बाजारभावाने चांगलाच नीचांक गाठल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणीच आणले. अवघ्या ३० व २० रुपये दराने व्यापाºयांनी टोमॅटो खरेदी करण्यास सुरुवात केली. टोमॅटो विक्रीच्या पैशातून गाडीभाडेदेखील सुटत नसल्याने संतापलेल्या शेतकºयांनी बाजारपेठेबाहेरील नाल्यातच माल फेकत घर गाठले, तर काही शेतकºयांनी माल विक्री न करता घरी घेऊन जाणे पसंत केले.  प्रस्तृत प्रतिनिधीने काही शेतक-यांशी संवाद साधला असता त्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. शेतकºयांना वीज वितरणाचे बिले भरा नाही तर कनेक्शन कापण्याच्या नोटीसा, जिल्हा बॅँकेची धडक वसुली मोहीम व त्यातच टोमॅटोचे पडलेले भाव पाहता, शेतकरी संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले.टोमॅटो लागवडीपासून आजपर्यंत दोन लाख खर्च झाला. परंतु आतापर्यंत फक्त दहा हजार कमवले. दिवसेंदिवस घसरणाºया दरामुळे पिकावर नागर फिरवायलाही हिम्मत होत नाही. कारण पोटच्या पोरा इतकाच पिकालाही जीव लावला आहे.- सोमनाथ निंबेकर, शेतकरी, रवळगाव

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्ड