शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरीत वाढीच्या विरोधात शेतकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:47 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकºयांना शेतकामासाठी लागणाºया मजुरांनी रोजंदारीत अवास्तव वाढ केल्याने परिसरातील शेतकºयांनी एकत्र होत महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशेच रुपये रोजंदारी देण्यावर एकमत करण्यात आले तसेच त्यापेक्षा कमी अधिक मजुरी दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देबैठक : महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशे रुपये मजुरीे

जितेंद्र साठे । मातोरी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकºयांना शेतकामासाठी लागणाºया मजुरांनी रोजंदारीत अवास्तव वाढ केल्याने परिसरातील शेतकºयांनी एकत्र होत महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशेच रुपये रोजंदारी देण्यावर एकमत करण्यात आले तसेच त्यापेक्षा कमी अधिक मजुरी दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कमी रोजंदारीवर शेतमजूर मिळत नसल्याने व दुसरीकडे शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत चालल्यामुळे विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांची बैठक गिरणारे येथील घाडगे लान्स येथे घेण्यात आली.त्यात वाडगाव, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, आडगाव, मखमलाबाद, चांदशी, मनोली, दरी, साडगाव, येथील लहान- मोठे शेतकरी गिरणारे येथे जमा होणाºया मजुरांच्या पाटीवरून रोज मजूर ठरवून शेतकामासाठी शेतात घेऊन जातात, टमाटा अथवा इतर पिकास चांगल्या प्रमाणात बाजार असल्यास त्यांना शेतकरी वर्ग मजुरी वाढूनही देतात ,परंतु यंदा मात्र टमाट्याच्या पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने मजुरांना मजुरी कशी वाढून द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच इतर शेतीच्या कामासाठी येणाºया देवरगाव, कोचरगाव, हरसूल, ओझरखेड, विलवंडी, धोंडेगाव येथील महिला व पुरुष मजुरांनी ४००ते ५०० रुपये मजुरी दिली तरच कामावर येऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकºयांना वाहतूकदार याचे भाडे, टमाट्यावरील कीटकनाशके फवारणी, हमाली, मजुरांची मजुरीसाठी पैसे आणायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. यावेळी सीताराम पिंगळे, समीर धोंडगे, दीपक धोंडगे, संजय हेगडे, रमेश पिंगळे, सतीश कातड, पप्पू बर्वे, रवि साठे, तानाजी पिंगळे आदी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.टमाटा खुडणे केले बंदटमाट्याला पन्नास रुपये क्रेट भाव व त्यात वाढीव मजुरी त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी टमाटा खुडणेच बंद केले आहे. या सर्व पश्नांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी शेतकºयांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात मजुरांचाही विचार करून महिलांना २००, तर पुरुषांना २५० रुपये इतकी मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच मजुरांना कामासाठी सकाळी शेतकºयांनी घेऊन जाणे व सायंकाळी पाच वाजता सुट्टी करून त्यांना पुन्हा पाटीवर आणून सोडण्याचे ठरले. सदरचा नियम एकाही शेतकºयाने मोडू नये अन्यथा योग्य ती कारवाही करण्याचे ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती