कमी भावामुळे शेतकरी मेटाकुटीस
By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-06T23:38:44+5:302016-06-07T07:32:04+5:30
लासलगाव : कांदा उत्पादकांकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे दुर्लक्ष

कमी भावामुळे शेतकरी मेटाकुटीस
लासलगाव : लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची ६६,५८५ क्विंटल एवढी आवक होऊन बाजारभाव ३०० ते ९६३ रुपये, तर सरासरी भाव ८४० रुपये राहिले. त्यापैकी नाफेडमार्फत २,१७५ क्विंटल कांद्याची खरेदी होऊन बाजारभाव रु पये ७८५ ते ९२० सरासरी रुपये ८६८ रुपये प्रतिक्विंटल राहिले.
सर्वच शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या नजरा अद्याप लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादकांना मिळणाऱ्या कमी भावाकडे गेलेले दिसत नाही. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक असली तरी कमी कांद्याचे भाव लिलावात जाहीर होत असल्याने कांद्याची विक्री करण्यास शेतकरी नाराज आहेत. परंतु कांद्याची विक्री केली नाही तर जून महिन्यात करावयाच्या खरिपाच्या मशागतीसाठी पैसा कसा उभा करावयाचा या चिंतेत शेतकरी आहेत.
१९८० साली शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांनी कांदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. परंतु उन्हाळा कांद्याला प्रतिक्विंटल
तीनशे, नऊशे रुपये मिळणारा भाव फारच कमी आहे. यातून उत्पादन खर्च भरून निघणारा नाही असा आहे. (वार्ताहर)