खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊन पावला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 06:05 PM2020-07-28T18:05:10+5:302020-07-28T18:05:37+5:30

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन पाळावा लागत असल्याने निफाड सारख्या सधन तालुक्यातील शेतीची कामे करणारे मजूर गावी गेले होते, तसेच शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे.

Farmers locked down for kharif season ... | खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊन पावला...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊन पावला...

Next
ठळक मुद्देपेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजूर परतले शेती मशागतीला

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन पाळावा लागत असल्याने निफाड सारख्या सधन तालुक्यातील शेतीची कामे करणारे मजूर गावी गेले होते, तसेच शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे खेडेगावातून शहराकडे कामानिमित्त स्थलांत केलेल्यांची घरवापसी झाल्याने कधी नव्हे असा मजुरवर्ग गावागावात सद्या उपलब्ध झाला आहे. असे असतांनाही मजुरीचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने तोट्याच्या शेतीला कोरोनाच्या संक्र मणाने शेवटी बळीराजालाही जास्त मजुरी देण्याच्या प्रकारामुळे तोंडघसी पाडले आहे.
गेल्या चार महिन्यापासून जवळपास महाराष्ट्रातील अनेक महानगरात कोरोना संक्र मणाची साखळी घट्ट होत असल्याने ते रोखण्यासाठी प्रशासनाला कडक लॉगडाऊनची अंमलबजावणी करावीच लागत आहे. या लॉग डाऊनमुळे छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले असून कंपन्यात व इतर सर्व क्षेत्रात कमी उपस्थिती गरजेचे असल्याने कंपन्यांनी यातून काढता पाय घेत नोकरवर्ग व मजुरांची कपात केली आहे. हे नोकर व मजूरवर्ग परतीच्या मार्गाने घरी परतले असून शेतीमध्ये राबत आपला चरितार्थ सद्या चालवीत आहेत.
चार महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही कोरोना बाधितांचा हा आकडा वाढतच असल्याने शहराकडे जाण्याचा इरादा अनेकांनी सद्या तरी सोडून दिला असुन शेतकऱ्यांच्या साथीला हातभार लावताना त्यांना शहरातील अधिक मजुरीची सवय असल्याने शेतीत पण चांगली रोजदारी मिळावी यासाठी अंगावर (उधडे) काम घेऊन जास्त मजुरी घेण्यावर भर असल्याने मजुरीचे दर वाढविले जात आहेत. परिणामी संकटात सापडलेल्या शेतकºयाला वाढलेले मजुरीचे दर चिंतेत भर पाडत आहे.

मजुरीचे दर व खताची कमतरता सतावतेय...!
सद्या खरीप हंगामासाठी मजुरांची मुबलकता असतांना मजुरीचे दर मात्र अजूनही चढेच आहे. पाऊस टप्प्याटप्प्याने पडत असल्याने आंतरमशागतीला भरपूर वेळ मिळत गेला तरी मजुरीचे दर मात्र कमी होण्याची नाव घेत नसून एका दिवसाला पारगी दुपारपर्यंत निंदणीचे २०० ते २५० रु पये तर फवारणी व कोळपणीसाठी ३०० ते ३५० रु पये शेतकºयांना मजुरी द्यावी लागत आहे.

Web Title: Farmers locked down for kharif season ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.