योग्य दरासह नोकरी देण्याच्या अटीवर शेतकरी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:36+5:302021-09-24T04:16:36+5:30

साकूर ते व्हीटीसी फाट्यादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले ...

Farmers insist on providing jobs at reasonable rates | योग्य दरासह नोकरी देण्याच्या अटीवर शेतकरी ठाम

योग्य दरासह नोकरी देण्याच्या अटीवर शेतकरी ठाम

साकूर ते व्हीटीसी फाट्यादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, यासाठी शासनाने योग्य दर निश्चित करून वाढीव मोबदला शेतकऱ्यांना दिला पाहिजे. याआधीच शासनाने विविध प्रकल्पासांठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे काही गुंठेच जमीन शिल्लक आहे. त्यातच आता समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी पुन्हा एकदा जमिनी संपादित करण्याचा डाव शासन खेळत आहे. आता उर्वरित जमिनीदेखील शासन संपादित करणार असल्याने शेतकऱ्यांनी जगण्यापेक्षा जालियनवाला बागेच्या घटनेची पुनरावृत्ती करा, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मुसळे यांनी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासमोर मांडली. इगतपुरी तालुक्यातील जवळपास ९० टक्के जमिनीपैकी ५४ हजार हेक्टर जमिनी याआधीच शासनाने विविध प्रकल्पासांठी संपादित केल्या आहेत. भविष्यात येथील शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक राहत नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, समृद्धी महामार्गाचे अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोरसे, गोसावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण भोर, सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे, तलाठी सुवर्णा गांगुर्डे, तलाठी सुरेखा कदम, ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, सरपंच नंदराज गुळवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

साकूर ते व्हीटीसी फाटादरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी शासनाने भावना विचारात घेऊन भविष्यात शेतकरी रस्त्यावर येणार नाही या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी. योग्य दर निश्चित करून वाढीव मोबदला मिळावा.

-पंढरीनाथ मुसळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नांदूरवैद्य

कोट....

समृद्धी महामार्गाच्या या जोडरस्त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात याचा फायदाच होणार आहे. पुढील आठवड्यात जमिनींची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात येईल. त्यानंतर दर निश्चित केल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. यावेळी शेतकरी नाराज होणार नाहीत यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत.

-तेजस चव्हाण, प्रांताधिकारी, इगतपुरी

फोटो- २३ नांदूरवैद्य मीटिंग

नांदूरवैद्य येथे समृद्धी महामार्गाच्या जोडरस्त्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी तेजस चव्हाण. समवेत समृद्धी महामार्गाचे अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गोसावी, बोरसे, सरपंच ॲड. चंद्रसेन रोकडे व उपस्थित शेतकरी.

230921\23nsk_33_23092021_13.jpg

फोटो- २३ नांदूरवैद्य मिटींग

Web Title: Farmers insist on providing jobs at reasonable rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.