शेतकऱ्यांच्या भारत बंदला काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST2021-03-27T04:14:23+5:302021-03-27T04:14:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला येथील राष्ट्रवादी ...

Farmers' India Bandla Congress, NCP's support | शेतकऱ्यांच्या भारत बंदला काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या भारत बंदला काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला येथील राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व काॅंगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सादर केले आहे. शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची देशद्रोही, पाकिस्तानी समर्थक म्हणून संभावना करण्यात येत आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधुराचा वापर, त्यांच्या मार्गात खिळे ठोकून त्यांना जेरबंद केले जात आहे. त्यामुळे भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यावेळी काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सतीश पगार, केवळ हिरे, सागर पाटील, विजय जगताप, भूपाल भोसले, संदीप ठाकरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

----------------

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंद आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (२६ मालेगाव १)

===Photopath===

260321\26nsk_7_26032021_13.jpg

===Caption===

२६ मालेगाव १

Web Title: Farmers' India Bandla Congress, NCP's support