शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची महापालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:10 IST

नाशिक- मखमलाबाद शिवारात आधी नगररचना योजना आणि नंतर ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट राबविण्याच्या प्रस्तावाला या भागातील शेतक-यांचा विरोध कायम असून महासभेत टीपीच्या ...

ठळक मुद्देग्रीन फिल्डला विरोध: भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी

नाशिक- मखमलाबाद शिवारात आधी नगररचना योजना आणि नंतर ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट राबविण्याच्या प्रस्तावाला या भागातील शेतक-यांचा विरोध कायम असून महासभेत टीपीच्या प्रारूपाला मंजुरी देऊ नये यासाठी मंगळवारी(दि.२९) शेतक-यांनी आधी महापौरांच्या निवासस्थानी आणि नंतर मुख्यालयात धडक दिली.नगरररचना योजनेस विरोध करण्यासाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून शेतकरी आणिशेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी आयुक्त, महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विरोध नोंदवत होते. मंगळवारी (दि.२९) महासभेतयासंदर्भातील प्रस्ताव असल्याने सकाळीच महापौर सतीश कुलकर्णी यांच्या शासकिय निवासस्थान असलेल्या रामायण या बंगल्यावर धडक दिली. त्यामुळे गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणा कडक करतानाच सर्व प्रवेशव्दार सुरक्षा रक्षकांनी बंद केले. त्यामुळे शेतकरीच काय परंतु महापालिकेच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना प्रवेश मिळणे कठीण झाले. शेतकरी आंदोलन करण्यासाठी आलेले बघितल्यानंतर विरोधकांना देखील स्फूरण चढले. मात्र, प्रस्ताव अभ्यासासाठी दोन ते चार दिवस राखीव ठेवा असे सांगत सर्वांनीच बेतास बात विरोध केला.विरोध करूनही प्रस्ताव मंजूर झाल्याचे समजल्यानंतर सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली. प्रवेश नाकारल्याने प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. दरम्यान, यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन महापौरांना दिले.प्रस्तावित हरित क्षेत्र विकास योजनेसाठी महासभेने काही अटी, शर्तींवर परवानगी दिली होती. मात्र, त्याचे पालन झाले नाही असा आरोप आंदोलकांनी केला. याप्रकल्पास पन्नास टक्यांपेक्षा अधिक शेतक-यांचा विरोध असल्याची खात्री नगररचना विभागाच्या संचालकांनी करावी आणि नियमानुसार टीपी स्कीमचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन देणाºयांमध्ये बालाजी बेंडकुळे, शाम काश्मीरे, किसन वाघमारे, अरूण थोरात, भरत जगझाप, हरी जगझाप, किशोर मोरे, शंकर खैरे आदींचा समावेश होता.भाजपात फाटाफुटमहापालिकेत भाजपाची सत्ता असून देखील नगररचनाच्या विषयावरून याच पक्षात फाटाफूट असल्याचे दिसून आले. उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी यापूर्वीपासूनच या विषयाला विरोध केला आहे. माजी नगरसेवक संजय बागुलयांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी महापालिकेत निवेदने दिली आहेत. त्यानंतर भाजपाचेच माजी नगरसेवक सुरेश पाटील देखील शेतकºयांचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे या विषयावरून भाजपातील फाटाफुट उघड झाली आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका