शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज
By Admin | Updated: September 25, 2015 00:12 IST2015-09-25T00:11:16+5:302015-09-25T00:12:11+5:30
जायखेडा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची धावती भेट

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज
जायखेडा : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येला नैसर्गिक आपत्ती व शासनाचे शेतीविषयक चूक धोरण जितके जबाबदार आहे तितकीच जबाबदार आपली संपूर्ण व्यवस्था असून, ही व्यवस्था बदलण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्ज मुक्त केले पाहिजे व त्यांना जगण्याची संधी दिली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या धावत्या दौऱ्यादरम्यान जायखेडा, सोमपूर येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी खासदार राजू शेट्टीचा सत्कार करण्यात आला. जायखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच जयश्री बच्छाव, उपसरपंच संजय मोरे, ज्येष्ठ नेते पंडित मोरे, सोमनाथ ब्राह्मणकार, पं. स. सदस्य लक्ष्मण सोनवणे, अनिल आहिरे, शांताराम आहिरे, अशोक जगताप, संजय बच्छाव, निंबा मोहिते, बापू खुडाणकर, शिवाजी कापडणीस, शरद धिवरे, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर सोमपूर येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात उपस्थित शेतकऱ्यांशी खासदार शेट्टी यांनी संवाद साधला.
सत्तापरिवर्तन करून नवीन सरकार सत्तेत आणले खरे मात्र त्यांनीही शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा शेतकरी चळवळीचे उगमस्थान असल्याने या आंदोलनात महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्ह्याने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सोमपूर, तांदूळवाडी, भडाणे, नांदिन व परिसरातील शेतकऱ्यांनी विविध समस्यांची निवेदने दिली. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, योगेश भामरे, जालिंदर पाटील, गिरीश भामरे, जगदीश इनामदार, डॉ, भास्कर भामरे, अॅड. नाना भामरे, सचिन भामरे, गोविंद पगार, संजय भामरे, दत्ता पवार, संजय वाघ, दीपक भामरे, राकेश बोरसे, प्रशांत भामरे, विजय भामरे, धनंजय भामरे, आनिल शिंदे, बाळासाहेब भामरे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)