गणेशोत्सवाचे पैसे देणार शेतकऱ्यांना

By Admin | Updated: September 23, 2015 00:03 IST2015-09-23T00:02:22+5:302015-09-23T00:03:12+5:30

गणेशोत्सवाचे पैसे देणार शेतकऱ्यांना

Farmers to give Ganeshotsav's money | गणेशोत्सवाचे पैसे देणार शेतकऱ्यांना

गणेशोत्सवाचे पैसे देणार शेतकऱ्यांना

नाशिक : दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करून त्यावर होणाऱ्या खर्चाला कात्री लावत तब्बल ५० हजारांची मदत शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केलेल्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय गोविंदनगर, शिवरामनगर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.
दरवर्षी सभासदांच्या वर्गणीतून गणेशोत्सवासाठी साधारणत: ६० हजार रुपये खर्च करण्यात येतो. तथापि यावर्षी फक्त ११ हजार रुपयांत वर्षाचे सर्व कार्यक्रम जसे गणेश उत्सव, कोजागरी, नवरात्र, रावणदहन आदि साध्या पद्धतीने साजरे करावेत, असा निर्णय सर्व ५५ सदनिकांच्या सभासदांनी एकमताने घेतला. शिल्लक रक्कम साधारणत: ५० हजार रुपये नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कार्यास सहाय्य करावे, असा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers to give Ganeshotsav's money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.