टोमॅटो लागवडीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:32+5:302021-06-01T04:11:32+5:30
दरवर्षीच्या तुलनेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली असून चालू वर्षी टोमॅटोचे उत्पादनदेखील वाढणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून ...

टोमॅटो लागवडीवर शेतकऱ्यांचा भर
दरवर्षीच्या तुलनेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली असून चालू वर्षी टोमॅटोचे उत्पादनदेखील वाढणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून मिळत आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने मशागतींच्या कामांना वेग आल्यामुळे यंदा टोमॅटो लागवड करण्यास प्रथम सुरुवात केली आहे. इंधन दरवाढीचा सर्वांत मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला असल्याचे बोलले जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रति एकर ४०० रुपयांपर्यंत ट्रॅक्टरच्या मशागतींच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना शेती मशागतीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. टोमॅटो लागवडीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत देखील यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल तेथून महागड्या दराने बांबू, तार खरेदी केली आहे. सध्या सर्वत्र शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी आपल्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसून येत आहे. येवला तालुक्यातील मानोरी, देशमाने, मुखेड फाटा, कोटमगाव, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर, नेऊरगाव, शिरसगाव लौकी आदी परिसरात ट्रॅक्टरच्या साहायाने सरी पाडून मल्चिंग पेपरचे आच्छादन प्रामुख्याने शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
रोप खरेदीसाठी गर्दी
टोमॅटोची रोपटे खरेदी करण्यासाठी निफाड तालुक्यातील उगाव परिसर सर्वत्र प्रसिद्ध असून येवला तालुक्यातील अनेक शेतकरी उगाव येथून टोमॅटो रोपटे खरेदी करण्यासाठी दररोज गर्दी करत आहेत. टोमॅटोच्या एका रोपट्यासासाठी सध्या दीड रुपयांपर्यंत दर द्यावा लागत आहे. राज्यात सीमा बंदी झाल्यास महागड्या टोमॅटोची निर्यात कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.
कोट....
टोमॅटो लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी करावा लागतो. त्यात दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण होत असून यंदाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर पाहावयास मिळाला. तरी शेतकरी वर्गाने पुढील निर्णयाचा विचार न करता यंदाही मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली आहे. मल्चिंग पेपरच्या आच्छादनामुळे निंदणी आणि खुरपणीच्या खर्चात बचत होणार आहे.
- गोकुळ कोटमे, शेतकरी, कोटमगाव खुर्द. फोटो - ३१ टोमॅटो
मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर कोटमगाव येथे टोमॅटो लागवड करण्यात व्यस्त असलेले शेतकरी.
===Photopath===
310521\31nsk_31_31052021_13.jpg
===Caption===
फोटो - ३१ टोमॅटो मान्सून पूर्व पावसाच्या भरवशावर कोटमगाव येथे टोमॅटो लागवड करण्यात व्यस्त असलेले शेतकरी.