शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत निघेल तेवढा कांदा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:32 IST

चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर्च तरी वसूल व्हावा या अपेक्षेपोटी दहा किलोपासून एक क्विंटलपर्यंत जेवढा निघेल तेवढा कांदा बाजारात विक्र ी करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देकिरकोळ विक्री : झालेला खर्च काढण्याचा प्रयत्न

उमराणे : चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर्च तरी वसूल व्हावा या अपेक्षेपोटी दहा किलोपासून एक क्विंटलपर्यंत जेवढा निघेल तेवढा कांदा बाजारात विक्र ी करताना दिसत आहेत.कांदा कमी प्रमाणात असल्याने शेतकरी सायकल, मोटारसायकलवर कांदे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. चालू आठवड्यात उन्हाळ व लाल कांद्याच्या आवकेत कमालीची घट आल्याने कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी उन्हाळ कांद्याचे दर १४ हजार रु पये तर लाल कांद्याचे दर १० हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सोडून दिलेल्या कांद्याच्या शेतात शेतकरी कांदे काढताना दिसत असून, काही प्रमाणात निघालेले कांदे क्रेट व गोण्यांमध्ये टाकून मोटारसायकलवर विक्रीसाठी आणत असल्याने येथील बाजार समितीत किरकोळ कांदा विक्रेते शेतकºयांची संख्या जवळपास पाचशेपर्यंत पोहोचली होती. दरम्यान किरकोळ विक्रीसाठी आलेल्या कांद्याची प्रतवारी कमालीची घसरली असल्याने त्यांना किमान दोन हजार ते पाच हजार रु पये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे.कांदा व्यापाºयांत घबराटीचे वातावरण असले तरी मागणी कायम असल्याने बाजारभाव स्थिर असून, सकाळच्या सत्रात येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे दर कमीतकमी ५ हजार रु पये, जास्तीत जास्त १३ हजार ८०० रुपये, तर सरासरी दर १० हजार रु पयांपर्यंत होते. तसेच लाल कांद्याचे दर कमीतकमी २ हजार रु पये, जास्तीत जास्त ९ हजार ४०० रु पये, तर सरासरी सहा हजार रु पये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा