अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:50 PM2020-02-01T22:50:07+5:302020-02-02T00:16:25+5:30

मुखेड : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असूनही मुखेड परिसरातील शेतकरी निधीपासून वंचित असल्याचे ...

Farmers did not receive the grant amount | अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळेना

अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळेना

googlenewsNext

मुखेड : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असूनही मुखेड परिसरातील शेतकरी निधीपासून वंचित असल्याचे चित्र दिसून आले आहे.
आधीच खरीप हंगामाने शेतकऱ्यांची जीवघेणी परीक्षाच घेतली. त्यानंतर आलेल्या पावसाने तर पिके बेचिराख झाली. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले असून, संबंधित प्रशासनाने तत्काळ अवकाळी निधी शेतकºयांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने हेक्टरी आठ हजार तर फळबागांसाठी सोळा हजार रु पये जाहीर केले. मात्र शेतकºयांना नुकसानभरपाईची रक्कम मिळविण्यासाठी शासन दरबारी चकरा मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागातील अधिकाºयांनी याबाबत गांभीर्याने विचार करीत शेतकरी हित साधण्याची मागणी येथील भाग्यलक्ष्मी विकास संस्थेचे संचालक विजय आहेर यांनी केली आहे.

Web Title: Farmers did not receive the grant amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.