पाथरशेंबे येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार अनुदानात घोळ?

By Admin | Updated: July 11, 2014 00:52 IST2014-07-10T23:06:58+5:302014-07-11T00:52:18+5:30

पाथरशेंबे येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार अनुदानात घोळ?

Farmers damaged by subsidies in Pathshenba? | पाथरशेंबे येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार अनुदानात घोळ?

पाथरशेंबे येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार अनुदानात घोळ?

चांदवड : तालुक्यातील पाथरशेंबे येथे मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपीटग्रस्तांना कमी मिळालेल्या अनुदानाबाबतचे निवेदन चांदवडचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खासदार, आमदार यांना पाथरशेंबे ग्रामस्थांनी दिले.
चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथे मार्च २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. शासनाने नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करूनही शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे गारपिटीने नुकसान झाले असताना त्यांचे अल्पनुकसान झाल्याचे दाखविले. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान असताना अल्पशा प्रमाणात अनुदान वाटप केले व गाव कामगार तलाठी यांच्या दप्तरातून क्षेत्राबाबत खात्री करून योग्य ते अनुदान त्वरित वाटप करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर अशोक ठाकरे, सुकदेव साठे, गणपत शेडगे, गंगाधर मोरे, सुरेभान शेडगे, शंकर साठे, कोंडाजी साठे, रमण नवले, काशीनाथ मोरे, शिवाजी साठे, बाळू साठे, संजय पवार आदिंसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Farmers damaged by subsidies in Pathshenba?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.