चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:22 IST2017-10-08T22:21:26+5:302017-10-08T22:22:57+5:30
चांदवड : शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. आॅक्टोबर हिटमुळे चांदवडकर हैराण झाले होते. शनिवारी दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने शेतकरी चिंतित
चांदवड : शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. आॅक्टोबर हिटमुळे चांदवडकर हैराण झाले होते. शनिवारी दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दुपारी चांदवड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. नांदूरटेक येथे शनिवारी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यात वीज अंगावर पडून सोपान बापू ठाकरे (१७), रा. नांदूरटेक या गंभीर जखमी झाला. त्यास पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्णन हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले याबाबतची माहिती सरपंच प्रभाकर ठाकरे यांनी दिली. याबाबत तहसीलदार डॉ.शरद मंडलिक, तलाठी बी. जी. खळेकर यांनी घटनेची नोंद घेतली आहे.
अर्धा तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक सखल शेतजमिनींमध्ये पाणी साचले. यामुळे अनेक पिकांचे तसेच कांदा- टमाट्याचे नुकसान झाले. कापणी करून ठेवलेली पिके पाण्यामुळे काळी पडली. परतीच्या पावसाने शेतकºयांसह नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडविली.