‘निसाका सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T01:37:56+5:302014-07-23T00:34:28+5:30
‘निसाका सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे

‘निसाका सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे
’निफाड : निफाड सहकारी साखर कारखाना पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी सभासदांनी आता जागृत झाले पाहिजे, निसाका संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखाना अवसायनात दाखवावा त्याशिवाय निसाकावर महिन्याकाठी वाढणारा दोन कोटी रुपये कर्जाचा बोजा थांबणार नाही, त्यानंतर निसाका भाडेतत्त्वावर चालवायला दिल्याशिवाय आपल्यासमोर आता पर्याय नाही. निसाका क्षेत्रातील ऊस उत्पादक, कामगार यांच्या भविष्यासाठी निसाका सुरू होणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनीही संघटित व्हावे, असे आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नाठे यांनी केले.
निसाका सुरू करण्यासाठी शिंगवे (ता.निफाड) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्याप्रसंगी शरद नाठे बोलत होते. अध्यक्षस्थानी निसाकाचे माजी संचालक झावरीबुवा रायते होते. व्यासपीठावर देवराम निकम, संपत गावले, निर्मला खर्डे, भास्कर डेर्ले, रामदास शिंदे, दिलीप गडाख, रखमाजी टर्ले, आनंदराव बोराडे, माणिकराव गायखे, नारायण खालकर, दीपक शिंदे, रामदास सानप आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या बैठकीला भास्कर टर्ले, वाळू आप्पा मोगल, बन्सी रायते, रामदास सानप, गोकुळ गिते, रामदास गिते, पांडुरंग डेर्ले, साहेबराव डेर्ले, भाऊसाहेब मोगल, रावसाहेब डेर्ले, रमेश शिंदे, अशोक डेर्ले, सुभाष डेर्ले, प्रभाकर रायते आदिंसह ऊस
उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)