शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:18 IST

यंदाही पावसाळा लांबल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतकामाच्या तयारीत असलेल्या शेतकºयाचे लक्ष आभाळाकडे आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याने चिंता

खामखेडा : यंदाही पावसाळा लांबल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतकामाच्या तयारीत असलेल्या शेतकºयाचे लक्ष आभाळाकडे आहे.हवामान खात्याने चालू वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळ्याला रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे; परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.दरवर्षी १५ मेनंतर पावसाचे वातावरण तयार होत असे. परंतु यावर्षी मे महिना संपत आला तरी पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. दिवसभर भरपूर उष्णता होते. परंतु जोरदार वारा वाहत नाही. आकाशात ढग ही जमा होत नाही. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष आकाशात लागु आहे.जर जातात. शेतकरी खरीपाच्या मशागतीच्या कामे पूर्ण करीत आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी आदि पूर्वमशागत म्हणजे जमिनीला बेले मारणे, वखारणी करणे, शेणखात मिळविणे आदि कामे केल्यास पिकांची पेरणी सुरळीत करता येते. परंतु रोहिणीच्या नक्षत्राने पाठ दाखिवली मृगाचा पावसात भुईमूगाच्या व इतर पिकाच्या दृष्टीने उत्तम असतो.जर मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाली तर बाजरी, भुईमुग, तुर, मका आदि पिकांची पेरणी करतात. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. खामखेडा परिसरामघ्ये मकाच्या पेरणी मोठया प्रमाणात केली जाते. जर मृग नक्षत्रात सुरवातील पाऊस पाडला नाही या पिकांची पेरणीस उशीर होणार आहे. तेव्हा भुईमूग, बाजरी, तुर, मुग, मका आदि पिकाऐवजी , सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे. अजूनही पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जास्त कालावधिच्या मका क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.गेल्या दोन वर्षापासूनब उशिरा येणाºया पावसामुळे पिकांची नियोजन बदल करावा लागत असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात पिकाचे उत्पादन येत नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने हाती उत्पन्न नआल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे.लांबलेल्या पावसामुळे शेतकºयांमध्ये आता चिंतेचे वातावरण असून, मागील दोन वर्षापासून दुष्काळाला सामोरे गेल्याने याही वर्षी तीच परिस्थिती उद्भवेल का? याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. गेल्या वर्षीही रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस