शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:09 IST

संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ...

ठळक मुद्देआधी केला होता विरोध; आता शिवसेनेच्या प्रमुखांच्या नामकरणासाठी आग्रह

संजय पाठक।नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता अचानक भूमिका बदलली असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे समृद्धीबाधीत शेतकºयांना धक्का बसला असून, त्याची प्रतिक्रिया निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मुळातच शिवसेनेने त्यास विरोध करून हा वेगळ्या विदर्भाचा डाव असल्याची टीका केली होती. तर प्रत्यक्ष महामार्गासाठी बाधीत गावे जाहीर होऊन जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू झाली तेव्हा शिवसेनेने स्थानिक स्तरावर त्याला कडाडून विरोध केला. खुुद्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचा मेळावा घेतला. त्यावेळी समृद्धी बाधितांच्या बाजूने म्हणजेच शेतकºयांच्या बाजूनेच उभे राहू आणि हा रस्ता होऊच देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून ९७ किलोमीटर क्षेत्रातून हा रस्ता जात असून, दोन्ही तालुक्यांतील ४९ गावे बाधीत होत आहेत. या गावांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली तसेच मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना डांबण्यापर्यंत आंदोलने करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु आता मात्र या रस्त्याला नाव देण्याच्या स्पर्धेत शिवसेनाच उतरली असून, मार्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिंदे यांची संदिग्ध भूमिकाबांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील समृद्धीबाधीत शेतकºयांनी भेट घेतली होती. त्यांनी सक्तीने भूसंपादन होऊ देणार नाही असा शब्द दिला, परंतु तो पाळला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकºयांनी कृतीशिल विरोधाची भूमिका घेतली होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या उत्तर महाराष्टÑाच्या मेळाव्याप्रसंगी समृद्धीसंदर्भात शेतकºयांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते; परंतु तसे घडले नाही. शिवसेनेने शब्द पाळला नाही.- राजू देसले, भाकपा.