दाट धुके अन् दवामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:24 PM2020-01-01T18:24:49+5:302020-01-01T18:27:01+5:30

खामखेडा : गेल्या तीनचार दिवसा पासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके आणि बारीक पाऊसाचे तुषार या रोगट वातावरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या वातावरणामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असी शक्यता आहे, असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

Farmers are shocked by the dense fog and medicine | दाट धुके अन् दवामुळे शेतकरी हैराण

खामखेडा परिसरात घाट धुके आणि त्या धुक्यातून लाईट लावून चलनारी स्कूल बस.

Next
ठळक मुद्दे खामखेडा : परिसरात काही दिवसांपासून रोगट हवामान

खामखेडा : गेल्या तीनचार दिवसा पासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके आणि बारीक पाऊसाचे तुषार या रोगट वातावरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या वातावरणामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असी शक्यता आहे, असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.
कसमादे परिसरात २०१४ हे वर्षे शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी फारच कसोटीदायक ठरले होते. कारण या वर्षात मार्च महिन्यात गरपिट आणि अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण याचा तडाखा कांदा पिकला बसला होता. त्यापेक्षाही नवीन २०२० ह्या वर्षांची सुरवात सकाळी धुके व त्यात पाण्याची बारीक तुषार पडण्यास सुरवात झाल्याने शेतकऱ्यांमघ्ये चर्चेचा विषय झाला आहे.
२०१९ या वर्षात आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाची पिके हातातून गेली. तरीही या आसमानी संकटातून पुन्हा शेतकºयांनी रब्बीचे उत्पादन घेण्याकडे लक्ष केंद्रित केले होत. मात्र गेल्या महिन्यापासून सतत हवामानात बदल होत होता.
कधी ढगाळ वातवरण तर कधी अवकाळी पाऊस तर कधी थंडी, कधी धुकट वातवरण या विचित्र हवामानामुळे शेतीच्या उत्पादनात घट होणार, खामखेडा परिसरात दर वर्षी उन्हाळी कांद्याचे मोठया प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकºयांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. तर काही अजूनही कांद्याची लागवड करीत आहेत.
२०२० या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी पहाटे अचानक वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला. प्रचंड प्रमाणात धुकट वातावरण तयार झाले. धुके इतके होते की रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. त्यात या धुक्याबरोबर पाण्याचे तुषार (दव) पडत होते. या धुकट वातावरणामुळे जमिनीत जोमात असलेला कांदा खराब होणार की काय असा प्रश्ण निर्माण झाला आहे.

 

Web Title: Farmers are shocked by the dense fog and medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.