शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:10 IST

 शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास  त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. 

नाशिक :  शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास  त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. गेल्या ७ एप्रिलपासून  योजनेला सुरुवात झाली असून, एप्रिल २०२२ पर्यंत  योजनेचा कालावधी असणार आहे, अशी माहिती    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  व्ही. एस. सोनवणे यांनी  दिली आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.   या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. तथापि सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत पात्र ठरणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे. विमा दावा दुघर्टनेनंतर ४५ दिवसांच्या आत प्रस्ताव तयार करून तालुका कृषी अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. याबाबत मार्गदर्शनासाठी व गावातील कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी  केले आहे.अपघाती मृत्यूला दोन लाखांचे विमा संरक्षणशेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. विमा दावा अर्जासोबत विहित नमुन्यातील पूर्वसूचना अर्ज, पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश, विचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, वयाचा दाखला , ६-क, ६-ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.  

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी