शहरालगत असलेल्या गंगापूर परिसरातील शेतकरी महिला.आॅनलाइन अर्जासाठी सर्व्हर डाऊनच्या तक्रारी
By Admin | Updated: May 27, 2014 17:00 IST2014-05-27T01:00:01+5:302014-05-27T17:00:39+5:30
आॅनलाइन अर्ज करण्यास गेलेल्या तरुणांनी सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याच्या तक्रारी केल्या

शहरालगत असलेल्या गंगापूर परिसरातील शेतकरी महिला.आॅनलाइन अर्जासाठी सर्व्हर डाऊनच्या तक्रारी
नाशिक : पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस दलात नव्याने भरती करण्यात येणार्या पोलीस शिपाई पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता़ गेल्या दोन-चार दिवसांपासून आॅनलाइन अर्ज करण्यास गेलेल्या तरुणांनी सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याच्या तक्रारी केल्या असून, बँकेत चलन भरण्यासाठी उद्या (दि़२६) शेवटचा दिवस आहे़ शहरात असलेल्या ४० महा ई-सेवा केंद्रामधून सुरळीत आॅनलाइन अर्ज सबमिट होत असल्याची माहिती केंद्रचालकांनी दिली आहे़ नाशिक शहरात ४२३, तर ग्रामीण पोलीस दलात १९२ जागांसाठी शिपाई पदाची भरतीप्रक्रिया राबविली जात आहे़ या पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास ५ मे पासून सुरुवात झाली असून, रविवारी (दि़२५) रात्री दहा वाजेपर्यंतची अखेरची मुदत होती, तर सायबरमध्ये जाऊन अर्ज भरणार्या उमेदवारांसाठी सोमवारी बँकेत जाऊन चलन भरण्याची अखेरची मुदत आहे़ दरम्यान आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवारांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार केली़ दुसरीकडे महा ई-सेवा केंद्रचालकांनी सर्व्हर सुरळीत असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)