शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला केली दुकानदाराने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 00:56 IST

विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या   ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि.१६) घडला. 

सटाणा : विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या   ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि.१६) घडला.  तरुणाच्या कपाळाला टाके पडले असून, उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी कठोर कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाडवी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.भाक्षी येथील शेतकरी सुनील रौंदळ यांनी स्टेट बँकेच्या सटाणा शाखेसमोरील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील ब्रँडेड कंपनीचे स्टार्टर मंगळवारी खरेदी केले. कारागिराकडून त्याची विहिरीवर जोडणी केली. ते सुरू करताच शॉर्टसर्किट होऊन रौंदळच्या हाताची बोटे भाजली. या प्रकाराविषयी त्यांनी दुकानदाराकडे मंगळवारी तक्रार केली. दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शाब्दीक खटके उडून दुकानदाराच्या मुलाने थेट नादुरुस्त स्टार्टर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मारले. कपाळावर खोलवर जखम होऊन ओठही फाटले. अशाही अवस्थेत दुकानदार व कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला बेदम मारहाण  केल्याने तो रक्तबंबाळ झाला. जखमी शेतकऱ्याने सटाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर झाले; परंतु मारहाण करणाऱ्यावर राजकीय दबावातून कारवाई टाळण्याचे प्रयत्न झाल्याने शेतकऱ्याने बुधवारी (दि.१७)  अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी