विष्णुनगर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:17 IST2019-04-06T00:05:32+5:302019-04-06T00:17:02+5:30
विंचूर : निफाड तालुक्यातील विंचूरनजीक असलेल्या विष्णुनगर येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विष्णुनगर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
विंचूर : निफाड तालुक्यातील विंचूरनजीक असलेल्या विष्णुनगर येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विष्णुनगर येथील शंकर चिंतामण घायाळ (५५) यांनी शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी किसन शेळके यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली. शेळके शेतात गेले असता शंकर घायाळ यांचा मृतदेह आढळून आला. शेळके यांनी पोलीसपाटील रामकिसन सुराशे व सरपंच किशोर मवाळ यांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस हवालदार योगेश शिंदे यांनी पंचनामा केला. बाहेरील व्यक्तीकडून उसनवारीचे पैसे घेतले असल्याने ती व्यक्ती शंकर यांना सतत तगादा लावून त्रास देत असल्याने शंकर यांनी आत्महत्या केली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.