निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:38 IST2017-10-24T01:38:50+5:302017-10-24T01:38:56+5:30

 Farmer suicides in Niphad taluka | निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या

निफाड तालुक्यात शेतकयाची आत्महत्या

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबाजी श्रीहरी हांडोरे (४७) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबाजी हांडोरे हे शेतात वस्ती करून राहत होते.  सोमवारी (दि. २३) नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला बाबाजी हांडोरे हे लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याने या घटनेची माहिती तातडीने निफाड पोलीस स्टेशनला दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हांडोरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. निफाड उपजिल्हारु ग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली मयत हांडोरे यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे ,सून असा परिवार आहे  हांडोरे यांच्यावर श्रीरामनगर सोसायटीचे १,८२ ५००इतके कर्ज आहे. तलाठी बाळासाहेब निफाडे व ग्रामसेवक राजेंद्र बोरगुडे यांनी याबाबतचा अहवाल निफाडच्या तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे. निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शखाली हवालदार शिवाजी माळी पुढील तपास करीत आहेत.


 

Web Title:  Farmer suicides in Niphad taluka