सिन्नर : धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जास कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.रमेश मारुती डुंबरे असे मृताचे नाव आहे. शनिवारी डुंबरे यांनी शेतातील कांदे काढून ठेवले होते. पत्नी जयश्री या कांद्यावर पात टाकण्यासाठी गेल्या असता त्यांनी पतीला बांधावर पाहिले. त्यांनी काय करतात? असे विचारता त्यांना पतीकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना हे दृश्य दिसले. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील व्यक्तींना घटनास्थळी बोलाविले. पोलिसांना सुसाइड नोट मिळाली असून त्यात सोसायटी, बँक व बचतगट या कर्जापोटी आत्महत्या करीत असल्याचे डुंबरे यांनी लिहिले आहे. पोलिसांनी सदर सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. डुंबरे यांच्या नावावर धनगरवाडी येथे दीड एकर जमीन असल्याचे समजते. आत्महत्याग्रस्त रमेश डुंबरे त्यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. डी. बलक हे करत आहे.
कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:06 IST
सिन्नर : धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जास कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
कर्जास कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देसोसायटी, बँक व बचतगट या कर्जापोटी आत्महत्या करीत असल्याचे डुंबरे यांनी लिहिले