देवारपाड्यात शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:06 IST2017-09-14T00:03:38+5:302017-09-14T00:06:04+5:30
नाशिक : मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८४ इतकी झाली आहे.

देवारपाड्यात शेतकºयाची आत्महत्या
नाशिक : मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून, जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८४ इतकी झाली आहे. नामदेव तुकाराम म्हस्के असे या शेतकºयाचे नाव असून, मंगळवारी दुपारी राहत्या घरातच त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या नावावर देवारपाडे येथे गट नंबर ५३/२ मध्ये ६७ आर इतकी शेती आहे. त्यांच्या नावावर कर्ज आहे किंवा नाही याची माहिती घेतली जात असून, यासंदर्भात पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तहसीलदारांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. रविवार ते मंगळवार सलग तीन दिवस शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.