शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:47 IST

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे.

दिंडोरी : तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. तक्र ार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या विरोधात शेतकºयांनी आंदोलन केल्यास त्यास सदर कंपनी मालक व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी दिला आहे.  शॅम्पियन प्रकल्पात दिंडोरी, निफाड, नाशिक व चांदवड तालुक्यातील सुमारे ४५०० द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद झाले १ कोटी ४ लाख रु पयांचे शेअर्स जमा करण्यात आले व एमएससी बँकेकडून शासनाची काही रक्कम असा पाच कोटींचा शॅम्पियन प्रकल्प उभा करण्यात आला. परंतु काही तांत्रिक बाबी व विक्र ीअभावी प्रकल्प बंद पडल्याने एमएससी बँकेने प्रकल्पाला दिलेले कर्ज थकले. त्यामुळे प्रकल्प विकण्यात आला.  सध्याच्या जमीनमालकाने खरेदीस अनेक अडचणी येत असतानाही अधिकाºयांना हाताशी धरून प्रकल्प केवळ पाच कोटी ११ लाखांनी विकत घेतला. त्यामध्ये स्थानिक शेतकºयांनी मोफत दिलेली करोडो रु पयांची जमीन, ४५०० सभासदांच्या शेअर्सची रक्कम याचा कुठलाही विचार केला नाही. केवळ वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून शेतकºयांवर अन्याय केला. या प्रकल्पात सध्या द्राक्षापासून वाइननिर्मितीचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून चालू आहे. प्रकल्पामुळे आपले द्राक्षांची विक्र ी होईल व आपल्या द्राक्षाला योग्य मोबदला मिळेल अशीही शेतकºयांना अपेक्षा होती.  परंतु आपल्या मनमानीपणाने बेभावात द्राक्षमाल खरेदी करायचा व संबंधित शेतकºयांवर अन्याय करायचे काम मालकाने सुरू केले आहे. प्रकल्पातून निघणाºया खराब पाण्यामुळे परिसरातील जमीनमालकांंना प्रदूषणाचा त्रास होत आहे.  परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी कंपनीकडे आणि पोलीस ठाण्यातही अर्ज दिलेले आहे. परंतु कंपनी फक्त दोन चार दिवत तात्पुरता बंदोबस्त करीत वेळ ढकलत आहे. जऊळके वणी येथे असलेला दुर्गंधीयुक्त वायनरी  प्रकल्प तेथून हलवला नाही, तर परिसरातील शेतकरी कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबतील व होणाºया परिणामांची जबाबदारी कंपनी मालक, पोलीस ठाणे,अधिकारी यांच्यावर राहील, लवकरच लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री, प्रदूषण विभाग यांच्याकडे तक्र ार केली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी सांगितले.२४ तास या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेजारील वस्तीवरील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसारखे रोग होत आहेत. जनावरांच्या व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्र ार करु नही सदर मालक थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. परिसरातील नागरिक वेळोवेळी कंपनीकडे तक्र ार करत आहेत. परंतु कंपनी दोन-चार दिवसांत बंदोबस्त करू असे सांगत वेळ मारून नेत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणFarmerशेतकरीagricultureशेती