शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याने पित्याच्या स्मरणार्थ सुरू केली जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:53 IST

सटवाईवाडीला पाणीटंचाई : टॅँकरचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत

ठळक मुद्देसटवाईवाडी येथे नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो.

देवळा : देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर पंकज अहेर ह्या शेतक-याने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू करून जनतेला दिलासा दिला आहे. दरम्यान, सटवाईवाडी ग्रामपंचायतीने शासनाकडे टॅँकर मागणीचा पाठविलेला प्रस्ताव लालफीतीतच अडकलेला आहे.सटवाईवाडी येथे नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. लोहोणर येथे गिरणा नदीपात्रातील उद्भव विहीर, व विंधन विहीरीतून सटवाईवाडी येथील जलकुंभात पाणी टाकण्यात येते. त्यानंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीच्या पाण्यावर हि योजना अवलंबून आहे. गिरणानदी कोरडी पडल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सटवाईवाडी गावात त्वरीत टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप टँकर मिळाला नाही. ग्रामस्थांचे होणारे हाल बघून येथील शेतकरी पंकज अहेर यांनी स्वखर्चाने गावात टँकर सुरू करून गावातील तृषार्त जनतेला दिलासा दिला आहे. यावेळी उपसरपंच अश्विनी अहेर, संभाजी अहेर, प्रा. गोरख निकम, प्रविण मेधने,विलास भामरे, चंद्रकांत अहेर, पुंडलिक अहेर, विजय अहेर, भावडू अहेर, श्रीराम अहेर, रामदास अहेर,रविंद्र अहेर,हेमंत अहेर, गणेश अहेर आदी उपस्थित होते.टँकर सुरू होत नाही तोपर्यंत  पाणीपुरवठाशासनाकडे टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर मिळाला नाही. गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाडयाचा टँकर घेऊन दिवसभर गावात तसेच वाडी, वस्त्यावर घरोघरी जाऊन पाणी वाटप सुरू केले आहे. दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा होतात. शासकीय टँकर सुरू होत नाही तोपर्यंत स्वखर्चाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.- पंकज अहेर , शेतकरी, सटवाईवाडी

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ