चंदन चोरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By Admin | Updated: July 31, 2016 22:37 IST2016-07-31T22:37:12+5:302016-07-31T22:37:32+5:30
चंदन चोरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

चंदन चोरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
द्याने : अंबासन, ता. सटाणा येथील शेतकरी रामचंद्र कोंडाजी कोर यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करून चंदन तस्कर फरार झाले. गंभीर जखमी झालेले कोर यांना नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोसम परिसरात चंदन तस्करांचा सुळसुळाट वाढला आहे. रामचंद्र कोंडाजी कोर यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पसार झाले. त्यातील एक हिंदीत तर दुसरी अहिराणी भाषेत बोलत होती.
जखमी अवस्थेत कोर यांना नामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्वरित दखल घेऊन चंदन तस्करांवर कारवाई
करणार असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)