शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

ओ शेठ, शेतकऱ्याने नादच केलाय थेट; जावयाला आणण्यासाठी धाडले हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:17 IST

पिंपळगावपासून  पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून  हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन  विवाहस्थळापासू काही अंतरावर लॅँड झाले.

- संजय दुनबळेनाशिक : हौसेला मोल नसते असे म्हणतात अन् त्यात हौशी शेतकरी असेल  तर विचारायलाच नको. पाच एका शेतकरी वधुपित्याने आपल्या लाडक्या कन्येच्या लग्नात नवरदेवाला आणण्यासाठी  हेलिकाॅप्टर पाठवले. नवरदेवाच्या घरापासून विवाहस्थळ अवघे पाच कि. मी. असताना हौसेसाठी हेलिकाॅप्टरला मात्र दहा किमीचा फेरा मारावा लागला. यामुळे शेतकऱ्याचा नादच खुळा याचीच सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे. 

ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित एकुलता एक मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला.  पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्स हे विवाहस्थळ अवघे पाच-सात किलोमीटरवर आहे. मोटारीने आले तर दहा मिनिटेही लागणार नाहीत. परंतु,एवढ्या अंतरासाठी सासऱ्यांनी जावयासाठी  चक्क हेलिकॉप्टरच पाठवले.

पिंपळगावपासून  पाच कि.मी वरील हेलिपॅडवरून  हे हेलिकॉप्टर नवरदेवाला घेऊन  विवाहस्थळापासू काही अंतरावर लॅँड झाले. तेथून नवरदेवाला गाडीने विवाहस्थळी आणण्यात आले.  पिंपळगाव बहुला ते  विवाहस्थळ या अंतरापेक्षा किती तरी जास्त हे अंतर आहे.  याचीच चर्चा सर्वत्र होती. 

प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि करून दाखवले.- गोपीनाथ बोडके, मुलीचे वडील

सासऱ्यांनी जे केले त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला ऐनवेळी सांगण्यात आले की, तुम्हाला हेलिकॉप्टरने यायचे आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. - संकेत नागरे, नवरदेव

टॅग्स :Nashikनाशिक