कंधाणे : कोसळलेल्या कांदा भावामुळे एका शेतकºयाला १७ क्विंटल कांद्याला वाहतूकखर्च वजा जाता अवघे ३७० रुपये मिळाले. यामुळे खिन्न झालेल्या शेतकºयाने कमिशन वजा जाता उरलेली रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली आहे.बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील कांदा उत्पादक शेतकरी रवींद्र भाऊराव बिरारी यांनी बुधवारी (दि. १२) येथील बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्र ीसाठी आणला होता. एक दिवस आधी त्याच कांद्याला ४८५ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुसºया दिवशी मात्र केवळ १५० रु पये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुरु वारी बिरारी यांनी या १७ क्विंटल कांद्यातून मिळालेल्या २३७० रु पयातून २००० रु पये ट्रॅक्टर भाडे अदा करून उरलेल्या ३७० रु पयातून ६० रु पये पोस्टल खर्च वजा करून उरलेले ३१० रु पये मनिआॅर्डरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहेत. कांदा उत्पादक शेतकºयांची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने हे केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीचा दहा ट्रॉली कांदा चाळीत शिल्लक असून, नवीन दहा एकर लाल कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने आपले कुटुंब आर्थिक गर्तेत सापडल्याचेही बिरारी यांनी सांगितले.सद्यस्थितीत बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी काढलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत पडून आहे. वर्षभर प्रतीक्षा करूनही समाधानकारक भाव न मिळाल्याने हा कांदा पडून असून, दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कांद्यांना अतिशय कवडीमोल भाव मिळत आहे.
शेतकऱ्याने केली मुख्यमंत्र्यांना मनिआॅर्डर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:49 IST
कोसळलेल्या कांदा भावामुळे एका शेतकºयाला १७ क्विंटल कांद्याला वाहतूकखर्च वजा जाता अवघे ३७० रुपये मिळाले. यामुळे खिन्न झालेल्या शेतकºयाने कमिशन वजा जाता उरलेली रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली आहे.
शेतकऱ्याने केली मुख्यमंत्र्यांना मनिआॅर्डर!
ठळक मुद्देकांद्याचा वांदा : वाहतूकखर्च वजा जाता क्विंटलला २२ रुपये भाव