शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खडक माळेगाव येथील शेतकऱ्याला सव्वा तीन लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:03 IST

लासलगाव : - द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाºया निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांची ३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे खात्यात शिल्लक नसल्याने सदरचे धनादेश परत

लासलगाव : - द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाºया निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांची ३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतात सोनाका वाण प्रकाराचा द्राक्ष बाग लावलेला होता. सहा फेब्रुवारी २०१८ रोजी द्राक्ष पूर्ण झाल्याने दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ रोजी ८१ क्विंटल द्राक्ष रुपये ३९ प्रति किलो या दरा प्रमाणे व्यापारी बापू रामेश्वर शिंदे यांच्याबरोबर तीन लाख १६ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाला. या व्यवहारा पोटी व्यापारी बापू शिंदे यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे धनादेश दिले होते. धनादेश बँकेत टाकले असता खात्यात शिल्लक नसल्याने सदरचे धनादेश परत आले. याप्रकरणी व्यापारी बापू शिंदे यांच्याकडे द्राक्षाच्या रकमेची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तुम्हाला तुमचे पैसे देत नाही काय करायचे ते करून घ्या असा दम दिला. पैसे मिळवण्यासाठी फिर्यादी यांनी गावातील तंटामुक्ती कडे पण तक्रार केली होती तेव्हा व्यापारी शिंदे यांनी पैसे देतो असे लिहून दिले मात्र आजपर्यंत द्राक्षमालाचे कुठले पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी