खडक माळेगाव येथील शेतकऱ्याला सव्वा तीन लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 08:25 PM2020-10-08T20:25:22+5:302020-10-09T01:03:43+5:30

लासलगाव : - द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाºया निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांची ३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A farmer from Khadak Malegaon was given Rs | खडक माळेगाव येथील शेतकऱ्याला सव्वा तीन लाखाचा गंडा

खडक माळेगाव येथील शेतकऱ्याला सव्वा तीन लाखाचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे खात्यात शिल्लक नसल्याने सदरचे धनादेश परत

लासलगाव : - द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाºया निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांची ३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक माळेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब रंगनाथ शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतात सोनाका वाण प्रकाराचा द्राक्ष बाग लावलेला होता. सहा फेब्रुवारी २०१८ रोजी द्राक्ष पूर्ण झाल्याने दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ रोजी ८१ क्विंटल द्राक्ष रुपये ३९ प्रति किलो या दरा प्रमाणे व्यापारी बापू रामेश्वर शिंदे यांच्याबरोबर तीन लाख १६ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाला. या व्यवहारा पोटी व्यापारी बापू शिंदे यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे धनादेश दिले होते. धनादेश बँकेत टाकले असता खात्यात शिल्लक नसल्याने सदरचे धनादेश परत आले. याप्रकरणी व्यापारी बापू शिंदे यांच्याकडे द्राक्षाच्या रकमेची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तुम्हाला तुमचे पैसे देत नाही काय करायचे ते करून घ्या असा दम दिला. पैसे मिळवण्यासाठी फिर्यादी यांनी गावातील तंटामुक्ती कडे पण तक्रार केली होती तेव्हा व्यापारी शिंदे यांनी पैसे देतो असे लिहून दिले मात्र आजपर्यंत द्राक्षमालाचे कुठले पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Web Title: A farmer from Khadak Malegaon was given Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.