शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 16:30 IST

देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे देवळा : तालुक्यात शेतवस्त्यांमधील नागरिक भयभीत; पिंजऱ्याची मागणी

देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.विंचूर-प्रकाशा महामार्गावर गुंजाळनगरपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही घटना घडली. परिसरात मागील तीन चार दिवसांपासून बिबट्या व त्याचे तीन बछडे संचार करत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ले केल्याची घटनादेखील घडली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शेतमजूर अशोक केदा गुंजाळ कामावरून घरी येत असताना शासकीय विश्रामगृहाजवळ आले असता द्राक्षबागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. गुंजाळ यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला; परंतु गुंजाळ या झटापटीत जखमी झाले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.गुंजाळनगरच्या ग्रामस्थांनी देवळा वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील व वन कमचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवळा वनक्षेत्र अंतर्गत उमराणा, देवळा, व खर्डा असे तीन वनपरीमंडल आहेत. देवळा-चांदवड सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगात घनदाट जंगल असल्याने हिंस्र प्राणी मोठ्या संख्येने आहेत. या जंगलालगत असलेल्या भिलवाड, कापशी, भावडे, वडाळे, कनकापूर आदी गावांच्या परिसरात बिबटया, लांडगे, रानडुक्कर आदी श्वापदांचा संचार असून, पाळीव प्राण्यांवर तसेच शेतकºयांवर त्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत गावातील मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतात काम करण्यास शेतमजूर येत नाही. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.- दीपक जाधव, ग्रामस्थ, गुंजाळनगर

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या