पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: August 10, 2016 22:14 IST2016-08-10T22:13:55+5:302016-08-10T22:14:39+5:30
पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा मृत्यू

पुराच्या पाण्यात शेतकऱ्याचा मृत्यू
दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथील मनोहर गंगाधर वडजे (४८) या शेतकऱ्याचा धामण नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.
वडजे नदी ओलांडून शेतात जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडले. प्रवाह वेगात असल्याने डोहाकडे ओढले गेले. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या पाण्यावर त्यांचे प्रेत तरगंताना दिसले व याची माहिती पोलीसपाटील रोहिणी वडजे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, मनोहर वडजे यांच्या कुटुंबीयाची परिस्थिती हलाखीची असून, शासनामार्फत योग्य ती मदत त्यांच्या कुटुंबाला करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी
केली आहे. (वार्ताहर)